The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

The Unusual Billionaires Marathi या पुस्तकात Saurabh Mukherjea यांनी महान कंपनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Asian Paints

महान कंपनीचा शोध

राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना एक व्यक्ती भेटली. ती व्यक्ती ऑइल refining क्षेत्रात कुठल्या प्रकारचा पेंट वापरावा हा सल्ला देण्याचे काम करत होती.

मी त्यांना विचारले, “मग तुम्ही कोणता पेंट सुचवता ? त्यांनी संकोच न करता लगेच ‘एशियन पेंट’ हे उत्तर दिले. “त्यांचा कोणी प्रतिस्पर्धी नाही, औद्योगिक पेंटमध्ये ते नेते आहेत,” तो पुढे बोलला.

“एशियन पेंट त्यांच्या क्षेत्रात नंबर एक का आहे ? ते स्वस्त आहेत की त्यांचे उत्पाद सर्वोत्तम आहे ?”, मी विचारले.

ते म्हणाले, “या प्रश्नाचे सोपे उत्तर नाही. एशियन पेंट बाजारात सर्वात महाग आहे. त्यांचे उत्पादन सर्वोत्तम आहे, पण इतर कंपन्याही त्यांच्या दर्जाचा माल बनवू शकतात. पण कोणीच बनवत नाही. मला माहित नाही एशियन पेंट नंबर एक का आहे, पण मी माझ्या ग्राहकांना तोच घेण्याचा सल्ला देतो.”

एशियन पेंट ला काय खास बनवतं ? दुसरे त्यांची बरोबरी का नाही करू शकत ? मुंबईला परतल्यावर मी ठरवले, मी आणि माझे सहकारी मिळून ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवू.

The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

महान कंपनी ची व्याख्या कशी करता येईल ?

महान कंपनी हुशार लोकांना आकर्षित करतात, व्यवसाय समूहात मान मिळवतात आणि बऱ्याच वेळा स्टॉक मार्केटला महाग असतात. पण महानतेची कोणतीही मानक परिभाषा नाही.

एशियन पेंट महान का आहे ? याचे कोणतेही सोपे उत्तर नाही. सहसा यशस्वी कंपनीना आपण महान असे गृहीत धरतो.

स्टॉक मार्केटमध्ये असेच होते. सर्वांना वाटते कंपनी महाग आहे, म्हणून कंपनी महान आहे.

लेखकाने महान कंपनी निवडण्यासाठी खालील पात्रता ठरवली आहे.

१. मार्केट Capitalization – शंभर करोड पेक्षा जास्त, कारण या पेक्षा कमी असलेल्या कंपन्यांच्या आकड्यावर जास्त विश्वास ठेवता येत नाही.

२. काळ – १० वर्ष

३. उत्कृष्ट आर्थिक कामगिरी

• Revenue Growth १०%
• ROCE १५%
दरवर्षी मागच्या १० वर्षांकरिता

ROCE – Return On Capital Employed. म्हणजे टॅक्स, व्याज देण्याआधीचे उत्पन्न. सामान्य भाषेत जेवढा ROCE असेल, तेवढा परतावा त्या स्टॉकमधून दीर्घावधीमध्ये मिळण्याची अपेक्षा असते. १५% ROCE, कारण तेवढा परतावा मिळण्याची आपण अपेक्षा करतो.

४. दीर्घायु – त्यांचे साम्राज्य किती वर्षे टिकले ?

स्टॉकच्या किमती दररोज बदलतात, पण महानता टिकाऊ गुणवत्ता आहे. स्टॉकच्या किमती ह्या कंपनीच्या महानतेचा परिणाम असतात, कारण नाही.

एशियन पेंट चे डीलर आणि डिस्ट्रीब्यूटर चे जाळे नवीन दावेदाराला सुरुवात करण्यास फार मोठा अडथळा ठरतात.

महानता त्रैमासिक निकाला मधून बदलत नाही.

महान कंपनी तीच ज्यात दीर्घावधी मध्ये उत्कृष्ट कामगिरी टिकवून ठेवण्याची क्षमता असते.

एशियन पेंट मध्ये 1991मध्ये गुंतलेला एक रुपया 2016 मध्ये 299 रुपये होते सरासरी वार्षिक दर 29%.

The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

Berger Paint

१. मूळ व्यवसायावर लक्ष देणे

Berger Paint, paint सोडून इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत नाही.

२. नाविन्य

Tinting Machine – अनेक रंग मिळवून हवा तो रंग दुकानातच बनवण्याची मशीन.

Berger कडे सुरुवातीला जास्त पैसा नव्हता त्यामुळे IIM च्या विद्यार्थ्यांना ते नोकरी वर ठेवू शकत नव्हते.

म्हणून मग बिजू कुरियन यांनी दोन नियम बनवले.

१. फक्त जागा भरण्यासाठी कोणालाही घेऊ नका.

२.पण जर तुम्हाला योग्य व्यक्ती भेटला तर जागा नसतानाही त्याला घ्या.

Berger ची संस्कृती आहे की ते कर्मचाऱ्यांना नवीन करण्याचे आणि चुका करण्याचे स्वातंत्र्य देतात.


The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

Marico

Marico चे नाव मरिवाला पासून आले आहे. मरीवाला, हे मिर्चीचे व्यापारी होते. गुजरातीमध्ये मरी म्हणजे मिर्ची.

पॅकिंग नवीनता

1980 मध्ये पॅराशुटने प्लास्टिकचा वापर सुरू केला. त्या आधी मोठ्या कंटेनरमध्ये तेल विकले जायचे. पण याला दुकानदारांनी विरोध केला. ते बोलले, “एका कंपनीने चौकोनी डब्बे बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून तेल गळत असे.”

प्लास्टिक आणि तेल दोन्हीमुळे उंदीर आकर्षित होतात आणि बॉटल फोडतात त्यामुळे पूर्ण दुकानात तेल वाहत असे. म्हणून पॅराशूटने गोल बॉटल बनवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे उंदरांना ती पकडता येत नसे. परीक्षण म्हणून त्यांनी बॉटल उंदरांच्या पिंजऱ्यात ठेवल्या, पण बॉटलला काही हानी झाली नाही. या परीक्षणाचे फोटो त्यांनी दुकानदारांपर्यंत पोहचविले. पुढे पंधरा वर्षात 100% तेलाच्या बॉटल प्लास्टिकच्या झाल्या. कमी खर्चाच्या प्लॅस्टिक पॅकिंग पासून उरलेला पैसा जाहिराती करिता वापरला. त्यानंतर पॅराशूटने मोठ्या तोंडाच्या बॉटल आणल्या हिवाळ्यात तेल गोठायचे म्हणून. नक्कल रोखण्यासाठी पॅराशूटने बॉटल विदेशातून मागविल्या. नक्कल करणाऱ्यांना तशा बॉटलची नक्कल बनवायला चार-पाच वर्षे लागत.

नफ्याच्या १० टक्के रक्कम पॅराशूट नवीन गोष्टी करून पाहण्याकरता वापरत असे. ठराविक भागात नवीन उत्पादनाची परीक्षा घेतली जात असे. प्रयोग यशस्वी झाल्यास सगळीकडे त्याचा वापर केला जात असे.

सफोला तेल हे Marico चेच उत्पादन आहे.

सफोला करडईचे तेल विकत असे, पण ते महाग असल्यामुळे त्याला जास्त मागणी नव्हती. म्हणून सफोलाने पुढे टेस्टी आणि गोल्ड या नावाने मिश्रित तेल बाजारपेठेत आणले. याचा परिणाम असा झाला की प्रीमियम तेलाच्या बाजारपेठेत सफोलाने, २०१५ साली ५८% कब्जा केला.

कामानंतर दारू पिणे किंवा रिकामा वेळ यामुळे कामगार संघटना तयार होतात, असे लक्षात आले. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू करण्याची सुरुवात Marico ने केली. Marico मध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तिका नसते आणि तिथे सुट्ट्यांचा हिशोब ठेवला जात नाही.

१९९६ मध्ये Marico मध्ये गुंतवलेला एक रुपया २०१६ मध्ये ११७ रुपये झाले होते.

पॅराशुटचे यश पाहून HUL ने टाटा ची निहार तेलाची कंपनी विकत घेतली. HUL ने पॅराशूटलाही विकत घेण्याचा प्रस्ताव पाठवाला. पण पॅराशुटने HUL सारख्या मोठ्या कंपनी पुढे हार मानली नाही,.शेवटी HUL लाच निहार कंपनी पॅराशूटला विकावी लागली.

The Unusual Billionaires Marathi By Saurabh Mukherjea

Page Industries

आपला ब्रँड आंतरराष्ट्रीय आहे दाखवण्याकरता Jockey नेहमी विदेशी लोकांचा वापर करतो.

पेज इंडस्ट्रीजमध्ये 88 % स्त्रिया काम करतात, त्यामुळे तिथे संप होण्याची शक्यता फार कमी असते. पेज इंडस्ट्रीजमध्ये सुपरवायझरला कर्मचाऱ्यांवर ओरडण्याची सक्त मनाई आहे. पेज आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवण, परिवहन आणि तसेच पाळणाघराची सुविधा देतं. औषधीही मोफत मिळतात. पेज नवीन लोकांना काम देण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना इतर जागी काम केल्यावर लागलेल्या वाईट सवयी नसतात.

Axis Bank

बँकेचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा वेगळा आहे, यात अंतिम उत्पादन असतं, ‘पैसा’. बँकेवर RBI चे नियंत्रण असते. त्यामुळे बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त काही वेगळे करण्याची सुविधा नसते. म्हणून बँकेची संपत्ती असते तिथले लोक, प्रक्रिया आणि ब्रांड.

अॅक्सिस बँक ची सुरुवात यूटीआय बँक म्हणून झाली होती. UTI ची रणनीती सरळ होती. अॅक्सिस बँक UTI च्या ग्राहकांचा वापर करेल, स्वतःचे उत्पादन विकण्यासाठी. P Jayendra Nayak यांची बँकेच्या सीएमडी पदी नियुक्ती झाली. त्यांनी स्वतःचा पगार न वाढवता कर्मचाऱ्यांचा पगार वाढला, त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांचा सन्मान मिळवला. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले या संस्थेचे तुम्ही मालक आहात, तुम्ही बदल घडवू शकता.

अनेक कंपन्यांचे सीईओ वाढी मागे पळतात. पण कधीकधी तुम्ही वाढू शकत नाही, कधी कधी तुम्हालाच वाढायचं नसतं. काही व्यवसायांमध्ये वाढीचा अर्थ असतो तुम्ही चुकीचे ग्राहक निवडत आहात किंवा तुम्ही जास्त धोका किंवा खूप जास्त कर्ज घेत आहात.

– Jamie Dimon

HDFC Bank

१० सेकंदात लोन ही नवी पद्धत एचडीएफसी बँक ने २०१५ मध्ये सुरू केली आणि अशाप्रकारे लोन देण्याची स्वतःची क्षमता 40 % ने वाढवली.

सिस्टम आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा अत्यधिक सन्मान केला जातो, इतके की त्याला SOP बँक म्हटले जाते. SOP म्हणजे Standard Operating Procedure. १९९५ मध्ये एचडीएफसी बँक मध्ये गुंतवलेला १ रुपया २०१६ मध्ये १३४ रुपये झाले होते.

ह्या कंपन्यां बद्दल अजून सविस्तर तुम्हाला वाचायचे असेल, तर हे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवरून विकत घ्या. ह्या पुस्तकाचा फायदा तुम्ही तुमच्यासाठी स्टॉक निवडतांना करू शकता.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेजला ला भेट द्या, चला संपत्ती निर्माण करूया.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.