Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी

Rich Dad Poor Dad Marathi हे Robert Kiyosaki यांचे पुस्तक आहे. हे पुस्तक एक गरीब पालक आणि एक श्रीमंत पालक यांच्या शिकवणूकीतील फरक सांगते.

Rich Dad Poor Dad Marathi

हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून विकत घेऊ शकता.

ज्या लोकांना मोठे लेख वाचणं आवडत नाही त्या लोकांसाठी ह्या लेखाचा विडिओ.

श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत.

तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही, ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिक, धडा घे, बदल.

तुमची समस्या तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता.

अनेक लोकांना जग बदलायचं असत पण स्वतःला बदलायचं नसतं. स्वतःला बदलणे हे जग बद्दलण्यापेक्षा सोपं आहे. अनेक लोकांचं नोकरी करण्यामागचं कारण भीती हेच असतं.

पैशांपासून दूर पळणे हा तेवढाच मोठा मूर्खपणा आहे जेवढा की पैशांमागे पळणे.

पुअर डॅड – गुंतवायला पैसे नाहीत.

रिच डॅड – पैसे नाहीत तर वेळ गुंतवा.

– Robert Kiyosaki

आर्थिक शिक्षणं का ?

Asset ( संपत्ती) – जे आपले पैसे वाढवतं.

Liability (दायित्व) – जे आपले पैसे कमी करतं.

संपत्ती निर्माण करणं हे, झाड लावण्यासारखं आहे. सुरवातीला तुम्ही त्याला दररोज पाणी देता. पुढे ते झाड एवढं मोठं होत की त्याला तुम्ही पाणी देण्याची गरज राहत नाही. याउलट तेच तुम्हाला सावली आणि फळ देतं.

श्रीमंत लोक संपत्ती जमा करतात. गरीब आणि मध्यमवर्गीय दायित्व. पैसे नसण्याच खर कारण आहे की लोकांना संपत्ती आणि दायित्व मधला फरक कळत नाही. श्रीमंत बनायचं असेल, तर संपत्ती घेत राहा. गरीब बनायचं असेल तर दायित्व घेत राहा.

कळपासोबत चालणे आणि शेजाऱ्यांच्या ऐशोआरामाची नक्कल करणे, अनेक समस्यांचं मूळ आहे.

शाळा वास्तविक जीवनासाठी मुलांना तयार करते का ?

शाळांना यासाठी बनवलं आहे की तिथे चांगले कर्मचारी तयार होतील, मालक नाही.

“संपत्तीचा विषय शाळेत नव्हे तर घरी शिकविला जातो. कदाचित म्हणूनच श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात, तर गरीब अधिक गरीब. आणि मध्यमवर्गीय कर्जात डुबून राहतात.”

श्रीमंत संपत्ती विकत घेतात.

गरीब फक्त खर्च करतात.

मध्यम वर्ग दायित्व घेतात, पण त्यांना वाटत ते संपत्ती घेत आहेत.

पैशाचे सुखी स्वप्नं, दुःखात कसे रूपांतरित होते ?

नुकतेच लग्न झालेले आनंदी, खूप शिक्षित पती – पत्नी भाड्याच्या घरात एकत्र राहू लागतात. लवकरच त्यांना असे वाटते की आपण पैशाची बचत करीत आहोत. कारण दोन लोकांनी एकत्र राहण्याचा खर्च जवळपास एकाच माणसाच्या खर्चा एवढा असतो. समस्या अशी असते की ते राहत असलेले अपार्टमेंट लहान आहे. त्यांचे स्वप्नवत घर विकत घेण्यासाठी ते पैशांची बचत सुरू करतात जेणेकरुन ते मुलांना जन्म देऊ शकतील. आता त्यांच्याकडे दोन पगार असतात आणि ते त्यांच्या कारकीर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यांचे उत्पन्न वाढू लागते.

जसे त्यांचे उत्पन्न वाढू लागते, त्यांचे खर्च वाढू लागतात.

जसजसे त्यांचे उत्पन्न वाढते, ते ठरवतात की आता यापुढे भाड्याच्या घरात राहायचे नाही, तर स्वप्नांचे घर घ्यायचे. जेव्हा ते स्वतःच घर विकत घेतात, तेव्हा त्यांना मालमत्ता कर नावाच्या नवीन कराचा त्रास सहन करावा लागतो. मग ते एक नवीन कार, नवीन फर्निचर आणि नवीन वस्तू विकत घेतात जेणेकरून त्यांचे घर विलासी वाटेल. अचानक ते त्यांच्या स्वप्नांमधून उठून पाहतात की त्यांचे दायित्व वाढले आहे. ते कर्जात आहेत आणि त्यांना तारण कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जाचे बरेच कर्ज परत करायचे आहे.

उंदीर शर्यत

आता ते उंदीर शर्यतीत अडकतात. एक मूल जन्माला येते. ते अधिक मेहनत करतात. जेवढे जास्त पैसे येतात तेवढा जास्त कर त्यांना भरावा लागतो. मग त्यांना आणखी एक क्रेडिट कार्ड मिळतं. ते कार्ड ते वापरतात आणि संपवतात. जेव्हा कर्ज कंपनीचा एखादा माणूस येऊन त्यांना सांगतो की त्यांची सर्वात मोठी संपत्ती, त्यांचे घर आहे. कंपनी त्यांना असेही सांगते की उच्च व्याज दराने घेतलेल्या ग्राहक कर्जाची परतफेड करणे शहाणपणाचे ठरेल. आणि या व्यतिरिक्त, त्यांना त्यांच्या गृह कर्जातून करात सूट देखील मिळेल.

(भारतात तर सहसा ही वेळदेखील येत नाही, लोक आधीच घर कर्जावर घेतात.) ते देखील तेच करतात आणि उच्च व्याज दर क्रेडिट कार्ड पासून सुटका मिळवतात. त्यानंतर सुटकेचा श्वास घेतात की क्रेडिट कार्डचे कर्ज संपले आहे. त्यांनी आता त्यांचे ग्राहक कर्ज, गृह कर्जामध्ये रूपांतरित केली आहे. त्यांना कर्ज 30 वर्षांच्या हप्त्यांमध्ये परत करावे लागणार असल्याने त्यांचे देयक देखील कमी होते. समस्येचा सामना करण्याचा हा स्मार्ट मार्ग आहे.

आता त्यांचे शेजारी येऊन त्यांना खरेदीसाठी आमंत्रित करतात – सेल चालू आहे असे सांगतात. काही पैसे वाचवण्याची ही संधी आहे सांगतात. ते स्वत: ला म्हणतात ‘मी काहीही खरेदी करणार नाही.’ मी फक्त पहायला जात आहे. ‘परंतु जर एखादी गोष्ट आवडली तर ती खरेदी करण्याच्या आशेने ते क्रेडिट कार्ड नेण्यास विसरत नाहीत. असे बरेच दांपत्य तुम्हाला मिळतात, त्यांची नावे फक्त बदलतात, परंतु त्यांची कथा तीच असते. ते लेखकाला विचारतात, ‘अधिक पैसे कसे कमवायचे ते सांगाल का? ‘त्यांच्या खर्चांच्या सवयींमुळे त्यांना अधिक पैसे कमविणे भाग पडते.

त्यांना हे देखील माहित नसते की खरी समस्या म्हणजे पैसे कमविणे नाही, तर पैसे योग्यरित्या खर्च करणे ही आहे आणि हेच पैशाच्या कमतरतेचे कारण आहे.

श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात.

अस्सल जीवनात हुशार नाही तर साहसी लोक पुढे जातात. अनेक लोक जीवनात संधी येण्याची वाट पाहत राहतात. ते संधी निर्माण करत नाहीत. अनेकांना तर आलेली संधी ओळखता पण येत नाही. वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही काय करत आहात, हे जर तुम्हाला माहित असेल तर तो जुगार नाही. धोका प्रत्येक गुंतवणुकीमधे असतो. पण ज्ञानाच्याआधारे तुम्ही धोका कमी करून जास्त परतावा मिळवू शकता. अनेक लोक फक्त यासाठी जिंकत नाहीत, कारण त्यांना हारायची भीती वाटते. शाळेत चूक केली की शिक्षा मिळते, पण जीवनात चुका करूनच आपण शिकतो.

बाकी इतर लोक फक्त मेहनत करतात.

शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नाही.

सर्व गोष्टींबद्दल थोडं थोडं ज्ञान असू द्या. कर्मचारी एवढंच काम करतात की त्यांना कामावरून काढण्यात येऊ नये आणि मालक तेवढाच पगार देतात की कर्मचारी काम सोडून जाऊ नये. नोकरी करताना युवकांनी किती कमावतो यापेक्षा किती शिकतो यावर भर द्यावा. जर नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा नसेल, फक्त एकाच क्षेत्राचा तज्ञ तुम्हाला बनायचं असेल. तर अशा जागी नोकरी करा, जिथे मजदूर युनिअन असेल, ते तुमचा बचाव करेल. Business System बनवण्यावर भर द्या.

अडथळ्यांवर मात करणं.

भीती

आळस

वाईट सवयी

हट्ट

या गोष्टींवर कशी मात करावी, Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी या पुस्तकात सांगितले आहे.

सुरुवात करणं.

तुम्हाला श्रीमंत का व्हायचं ? हे माहीत करून घ्या. येणारे अडथळे पार करायला ते तुम्हाला मदत करेल. तुमच्या ज्ञानात गुंतवणूक करा. तुमच्या मित्रांना सावधानपूर्वक निवडा, त्यांचा तुमच्यावर फरक पडतो. एका सूत्राचे तज्ञ बना, आणि नवे सूत्र शिका. आधी स्वतःला पैसे द्या. तुमच्या तज्ञाला चांगले पैसे द्या.

तुमच्या कामाशी काम ठेवा.

स्वतःसाठी काम करा. संपत्ती बनवण्यावर लक्ष्य द्या. दायित्वापासून दूर राहा.

टॅक्स चा इतिहास आणि कॉर्पोरेशन ची ताकत.

कॉर्पोरेशन चे कर्मचारी आणि मालक यांमधे काय फरक आहे, Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी या पुस्तकात सांगितले आहे.

कॉर्पोशन चे मालक श्रीमंत लोक

१. कमावतात.

२. खर्च करतात.

३. टॅक्स देतात.

कॉर्पोशन साठी काम करणारे कर्मचारी

१. कमावतात

२. टॅक्स देतात.

३. खर्च करतात.

अजून हवंय ? ‘हे करा’

जे करताय, ते करणं बंद करा. नवीन विचारांचा शोध घ्या.

पैसा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, तुमच्या विचारांवर काम करणं. हे काम Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी पुस्तक अप्रतिमपणे करतं.

Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून विकत घेऊ शकता.

या पुस्तकाचा पुढील भाग कॅशफ्लो क्वाड्रन्ट तुम्ही वाचू शकता.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तके पाहण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या चला संपत्ती निर्माण करूया
आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

11 thoughts on “Rich Dad Poor Dad Marathi रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी”

  1. रॉबर्ट कियोसाकी यांच्या पुस्तकाचा सार तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलात. फ्री pdf आणि पुस्तक विकत घेणे यात मानसिमधला फरक सुद्धा अगदी एका ओळीत आणि चपखल. धन्यवाद.

    Reply
    • खूप खूप धन्यवाद. ई-मेल अलर्ट ला subscribe करा, जेणेकरून नवीन लेखांचे अलर्ट मिळतील.

      Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.