नकार रोधक Rejection Proof Marathi By Jia Jiang

ही कथा आहे Jia Jiang तीस वर्षीय मॅनेजरची. त्याच्याकडे आज चांगली नोकरी, खूप पैसा, बंगला, बायको आहे. तसेच काही दिवसातच त्याला पहिले बाळ होणार आहे. पण तो समाधानी नाही.

वेळ किती लवकर निघून जातो ना ? तुमचे स्वप्न आणि वास्तविकता यामध्ये किती अंतर वाढत जाते ना ? आज अनेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न रात्री पाहून, सकाळी कामावर जातात. आज तुमचे वय किती ?

अमेरिकेत राहणारा हा मॅनेजर Jia Jiang चीन वरून एक स्वप्न घेऊन आलाय, “मी मायक्रोसॉफ्ट कंपनी विकत घेईल”. पण कालांतराने स्वप्न मागे पडत गेलं. कारण काय ? नाकारल्या जाण्याची भीती, सुरक्षा शोधणे. सर्वकाही भेटून ही सुख मिळत नव्हतं. कारण मनात खंत आपण चीनवरून जग बदलायला आलो होतो, मॅनेजर व्हायला नाही.

नकाराची भीती कुठून आली ?

लहानपणी शाळेत असताना QI नावाच्या प्रेमळ शिक्षिका होत्या. एक दिवस त्यांनी सर्व मुलांसाठी एक पार्टी भरवली होती. 40 मुलांकरिता 40 गिफ्ट आणले होते. गिफ्ट मिळण्याची एकच अट होती की, ज्या मुलाची दुसऱ्या मुला द्वारे प्रशंसा केली जाईल, त्याला गिफ्ट मिळेल. किती छान कल्पना आहे ना ? यात काय चूक होऊ शकते ?

इतर मुलांची नावे येताना मी जोर जोराने ओरडून त्यांना प्रोत्साहित करत होतो. हळूहळू गिफ्ट कमी होऊ लागले. माझा उत्साह तस तसा हळूहळू कमी होऊ लागला. मला वाटू लागले की माझ्या बद्दल कोणीच का काही चांगले बोलत नाही ? हळू हळू माझी काळजी भीती मध्ये रूपांतरित होऊ लागली. आता फक्त तीनच मुले उरली होती. दोन मुले जी कोणालाच आवडत नव्हती आणि मी. इतर प्रत्येक जण आपल्या जागी आपल्या गिफ्ट सोबत बसला होता.

आमच्या तिघांची तारीफ करायला मिस QI नी मुलांना परत परत विचारले. पण कोणीच आले नाही. शेवटी त्यांनी आमच्या बद्दल काहीही बोलायला बोलवले पण तरीही कोणीच आले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथे उभे राहण्यापेक्षा मरणे मला बरे वाटू लागले. शेवटी मिस QI यांनी आम्हाला गिफ्ट उचलायला लावले आणि जागेवर बसायला सांगितले.

लहानपणीचा अनुभव अत्यंत भयावह होता. अशा अनुभवामुळे होऊ शकते मला इतरांना त्रास द्यावा वाटले असते किंवा माझा आत्मविश्वास कमी झाला असता. पण नशिबाने मी तिसरा मार्ग निवडला. इतरांपेक्षा मी वेगळा आहे याची लाज वाटणे पेक्षा मी त्याचा स्वीकार केला. मला वाटले मी इतरांपेक्षा वेगळा आहे आणि मला इतरांसारखे बनायचे पण नव्हते. आणि त्यामुळेच मी थॉमस एडिसन, बिल गेट्स यांसारख्या समाजाच्या साच्यांमध्ये न बसणाऱ्या लोकांकडे आकर्षित झालो.

पण मग असे काय झाले की मी उद्यमी नाही बनलो ?

अमेरिकेत माझे कॉलेज सुरू झाले होते. एक दिवस जुना अल्बम मध्ये माझा रोलर स्केटिंग करताना चा फोटो पाहिला माझ्या मनात लगेच एक विचार आला की, टेनिस जोड्यांमध्ये जर रोलर ब्लेड लावले तर ?! लोक त्यांना हवे तेव्हा चालू लागतील किंवा घसरू शकतील, स्केटिंग करू शकतील.

उत्साहात मी स्केचेस काढायला सुरुवात केली. ब्लू प्रिंट तयार केली. मला असे वाटायला लागले जसे मी मोनालीसा तयार केली आहे. माझे काका जे अमेरिकेतच राहत होते, त्यांना मी माझ्या चित्राची कॉपी पाठवली त्यांचे मत जाणून घ्यायला.

त्यांनी माझी प्रशंसा करणे तर दूर राहिले, या उलट त्यांना माझी कल्पना मूर्खपणा वाटली. त्यांनी मला अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले आणि इंग्लिश सुधारण्यास सांगितले.

मला फार दुःख झाले मी माझ्या स्केचेस फेकून दिले. मी आता इंग्लिश सुधारण्यावर माझे लक्ष दिले. माझे नातेवाईक आणि मुख्यत: काका यांची मान्यता मिळविण्यासाठी मी आता व्याकुळ झालो.

दोन वर्षानंतर Roger Adams नावाच्या माणसाने माझी जशी कल्पना होती तसेच बूट पेटंट केले आणि कंपनीचे नाव Heelys ठेवले. 2007 मध्ये त्या कंपनीचा IPO आला तेव्हा कंपनीची किंमत जवळपास ७,००० करोड होती आणि माझी स्केचेस त्यावेळी धूळ खात पडले होते. एवढेच नाहीतर या दोन वर्षाच्या काळात मला अनेक कल्पना सुचल्या होत्या. पण त्याकडे लक्ष न देता मी इंग्रजी सुधारण्यावर भर दिला.

निश्चितच याची काही खात्री नव्हती का माझ्या प्रयत्नांना सुद्धा Roger Adams सारखे यश प्राप्त झाले असते किंवा माझ्या इतर कोणत्या कल्पनेला यश प्राप्त झाले असते. पण हेही खरे आहे की मी त्या कल्पनांना कधी संधीच दिली नाही.

माझी पत्नी

माझ्या पत्नीने माझ्या ह्या भावना ओळखल्या. ती म्हणाली पैसा, गाडी, बंगला, नोकरी दुसरे पण येतील पण तू पश्चातापात जगू शकत नाही. सहा महिने नोकरी सोडून तुझे स्वप्न पूर्ण करायला दे जर अयशस्वी झाला तर परत नोकरी कर.
माझ्या मनात आता प्रश्नांची शृंखला सुरू झाली. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा व्यवसाय सुरू केला नाही, अठरा वर्षांचा होतो तेव्हा व्यवसाय सुरू केला नाही, २२ वर्षांचा एकटा तरुण होतो तेव्हा केला नाही, २८ वर्षाचा मॅनेजर होतो तेव्हा केला नाही, मग आता तिसाव्या वर्षी मी जेव्हा बाप बनणार आहे तेव्हा कसा व्यवसाय सुरू करू शकतो ?

पुढे मी विचार केला आपण मेल्यावर लोक काय भाषण देतील ? त्यात मला कळले, माझ्या मृत्युपश्चात लोक मला फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखतील, जग बदलणारा व्यावसायिक म्हणून नाही.

पुढे चार महिने लोटले एका app वर काम सुरू झाले. गुंतवणूकदारासोबत चर्चा सुरू झाली. पण त्या गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार देत, केवळ ‘नाही’ असा इमेल केला.

नकारामुळे मी खचलो. मला वाटू लागले आपण उगाच चांगली नोकरी सोडून मूर्खपणा केला. मी ठरवले कंपनी बंद करून परत नोकरी सुरु करायची. कारण जवळचा पैसा आता संपत आला होता.

तेव्हा परत एकदा माझ्या पत्नीने हिंमतीचे शब्द उद्गारले, “मी तुला चार नाही सहा महिने दिले आहेत, जा पूर्ण मन लावून काम कर”.

मी परत आपल्या व्यवसायावर लक्ष देऊ लागलो. तेव्हा मला कळले जर आपल्याला यशस्वी उद्योजक बनायचे असेल तर नकारावर मात करावी लागेल. नकाराला भिऊन चालणार नाही.


नकारावर मात कशी करावी ?

नकारावर मात कशी करावी ? हे गुगल वर शोधताना मला एक कल्पना सुचली. आपण इतके नकार मिळवायचे की आपल्याला नकार मिळाला तरी वाईट वाटणार नाही. ही कल्पना मनात ठेवून मी शंभर दिवसांचे रिजेक्शन चॅलेंज सुरू केले.

चॅलेंज १ – अनोळखी व्यक्तीला पैसे मागणे.

चॅलेंजचा पहिला दिवस होता. अनोळखी व्यक्तीला $100 मागण्याचे ठरले. मी घाबरत घाबरत एका वॉचमन जवळ गेलो त्याला $100 मागितले. वॉचमनने नाही असे म्हटले आणि का म्हणून विचारले. पण मी त्याला उत्तर न देता ‘ठीक आहे’ म्हणून तिथून पळत सुटलो.

मी सर्व चॅलेंज व्हिडिओ ग्राफ करण्याचे ठरवले होते. घरी आल्यावर मी स्वतःला व्हिडिओ मध्ये पाहिले. मला कळले की मी किती घाबरलो होतो.

पण माझ्या एक गोष्ट लक्षात आले की त्या वॉचमनने का ? हा प्रश्न विचारला होता. जर मी त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले असते तर कदाचित मला $100 मिळू शकले असते. पुढल्या चॅलेंज वेळी पळून जायचे नाही, तर पटवून सांगायचे असे मी ठरवले. हा विडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

चॅलेंज ३ – ओलंपिक donut ची मागणी.

Olympic Rings

ऑलिंपिकच्या रिंग सारखे रंगीत डोनट मला बनवून पाहिजे होते. असे करणे शक्य नव्हते त्यामुळे मला वाटले आता मला नकार मिळेल. मी एका हॉटेल मध्ये गेलो. समोर रिसेप्शन काऊंटरवर मी माझी मागणी केली. त्या महिलेने थोडा वेळ विचार केला, पेपर वर काही चित्र काढून पाहिले. त्या महिलेने सांगितले की असे डोनट तयार होऊ शकतात. पण त्यांना जोडणे शक्य नाही, जसे की ऑलिंपिक च्या रिंग एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात. तुम्हाला हे डोनट कधी हवे असे त्या महिलेने विचारले ? नकार मिळवण्यासाठी मी उत्तर दिले पंधरा मिनिटं त्यावर ती महिला म्हणाली ठिक आहे.

त्या महिलेने मला ओलंपिक रिंग च्या रंगाचे डोनट बनवून दिले. जेव्हा मी तिला किंमत विचारली तेव्हा तिने पैसे घेण्यास नकार दिला. मी इथे नकार मिळवायला आलो होतो पण मला रंगीत डोनट मिळाले आणि तेही मोफत. जेव्हा या चॅलेंजचा व्हिडिओ मी युट्यूब वर टाकला तेव्हा तो लाखो लोकांनी पाहिला. त्या व्हिडिओमुळे मी प्रसिद्ध झालो अनेक न्यूज चैनल, वर्तमानपत्र वर माझ्या मुलाखती येऊ लागल्या. जर मी त्या महिलेला विचारले नसते तर हे सर्व शक्य झाले असते का ? या चॅलेंज चा विडीओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये पाहू शकता.

नकार एक मत आहे.

नकार एक मत आहे. नकार हे नाकारणाऱ्याच एक मत आहे. ऐतिहासिक संदर्भ, सांस्कृतिक मतभेद आणि मनोवैज्ञानिक कारणांचा नकारावर प्रचंड प्रभाव आहे. सार्वभौमिक नकार किंवा स्वीकृती अशी कुठलीही गोष्ट नाही.

“काही लोक कधीच माघार घेत नाहीत, जरी सुरुवातीला, किंवा वारंवार जग त्यांना नाकारत तरीही. ते तेच बनतात, जे त्यांना नेहमी बनायचं होत, कारण ते नकारातून शिकलेत त्यांचं स्वप्न त्यांना किती महत्वाचं आहे.”

– Jia Jiang

“तुमचे स्वप्न तुम्हाला मिळणाऱ्या नकारापेक्षा मोठे आहे का?”


-Dostoevsky

“जेव्हा खरी सर्जनशीलता घडते, तेव्हा ती अनेकदा नाकारल्या जाते कारण ती नियम आणि व्यवस्थेविरुद्ध असते.”

– Jia Jiang

या पुस्तकात Jia Jiang यांचे इतर १०० चॅलेंज दिले आहेत. ते फार मजेशीर आहेत. नकार मिळवायचा असूनही त्यांना प्रत्येक वेळी नकार मिळतो का ? त्यांना या १०० चॅलेंज मध्ये काय काय मिळत ? त्यांचा स्वतःच्या व्यवसायाचे काय होत ? त्यांना ओबामा ची मुलाखत मिळते का ? या पुस्तकात १०० चॅलेंज आणि त्यापासून नकारावर मात कशी करावी याचे धडे दिले आहेत. हे पुस्तक सर्वांनी वाचणे योग्य आहे. विशेष करून ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांना तर असे अनेक नकार मिळतील. मग नकारावर मात कशी करावी, हे जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या चला संपत्ती निर्माण करूया

2 thoughts on “नकार रोधक Rejection Proof Marathi By Jia Jiang”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.