Nikola Tesla निकोला टेस्ला , सुरवात ते अंत

Nikola Tesla निकोला टेस्ला चा IQ किती होता हे कोणालाही माहीत नाही आणि तो किती होता याने काही फरक पडत नाही. IQ मुळेच यश प्राप्त होते असे आता मानल्या जात नाही.

Nikola Tesla निकोला टेस्ला

आधीचे जीवन

वर्तमान त्यांचा आहे, भविष्य ज्यासाठी मी खरोखर काम केले आहे, माझे असेल.

Nikola Tesla

निकोल टेस्लाचा जन्म युरोपमधील स्मिल्झियान या छोट्या गावात झाला. टेस्ला यांचा जन्म १० जुलै १८५६ रोजी झाला होता.

टेस्लाचा जन्म विज आणि वादळादरम्यान झाला. आया म्हणाली हा अपशकुन आहे. तिने सांगितले की “हे मूल, अंधाराचे मूल होईल.” टेस्लाच्या आईने लगेच उत्तर दिले, “नाही, ते प्रकाशाचं बाळ होईल.”

अगदी लहानपणापासूनच निकोला टेस्ला संपूर्ण पुस्तक आणि गणिताचे पाढे लक्षात ठेवू शकत होता. त्याला कधीही जास्त झोपेची आवश्यकता नव्हती.

टेस्ला क्वचितच झोपत होता. तो दररोज फक्त दोन तास झोपायचा दावा करायचा. टेस्ला अजिबात न झोपता त्याच्या प्रयोगशाळेत दोन किंवा अधिक दिवस काम करायचा.

तो नवीन भाषा सहजपणे शिकू शकायचा. तो सर्बो-क्रोएशियन, झेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हंगेरियन, इटालियन आणि लॅटिन या आठ भाषा बोलू शकत होता.

पदवी घेतल्यानंतर टेस्ला स्मिल्जियानला परत आला जिथे त्याला कॉलराचा त्रास झाला. तो नऊ महिने आजारी होता, तो मरणार असे त्याच्या कुटूंबाला वाटत होते. टेस्ला बरा झाल्यावर सैन्यात भरती होण्याऐवजी जंगलात पळून गेला. यावेळी त्याने अनेक पुस्तके वाचली.

बरेच लोक मरतात २५ मध्ये पण त्यांना पुरल्या ७५ मध्ये जाते.

बेंजामिन फ्रँकलिन

रेडिओ

१९०१ मध्ये मार्कोनीने इंग्लंडहून न्यूफाउंडलंडला यशस्वीरित्या एक सिग्नल पाठविला. टेस्लाने तक्रार केली होती की हे काम त्याच्या पेटंट्सचा वापर करून केले गेले. परंतु कोर्टाने मार्कोनीच्या बाजूने निर्णय दिला.

अखेर सुप्रीम कोर्टाने टेस्लाचे म्हणणे मान्य केले, परंतु त्याच्या मृत्यू पश्चातच. रेडिओच्या शोधाचा जनक म्हणून मार्कोनी श्रीमंत झाला.

वैयक्तिक जीवन

निकोला टेस्लाने कधीही लग्न केले नाही.

टेस्लाला मोत्यांचा मोठा तिरस्कार वाटत असे. जर एखाद्या स्त्रीने मोती घातला असेल तर तो तिच्याशी बोलत नव्हता.

टेस्ला ची उंची ६ फूट २ इंच होती. तो बारीक होता आणि जीवनभर बारीकच राहिला.

नंतरचे जीवन

१९१२ मध्ये टेस्ला ला असा विश्वास होता की मेंदूला वीजेचा झटका दिल्याने विद्यार्थी हुशार होतात.

टेस्ला चा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सर्व सामान ताब्यात घेण्यात आले. लोकांचे असे मत होते की टेस्ला ने डेअथ रे तयार केली आहे आणि सरकारला ती इतरांच्या हातात पडू द्यायची नव्हती.

हजारो अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक जगतात आणि मरतात, त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव समाजाला आणि त्यांना स्वतःला न होताच.

Mark Twain

टेस्ला चा कोणत्याही संघटित धर्मावर विश्वास नव्हता. धर्मांध लोकांचा तो विरोध करायचा. त्याला ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माबद्दल सर्व काही वाचण्याची आवड होती.

निकोला टेस्ला अल्टरनेटिंग करंट, एक्स-रे, रेडिओ, रडार, जलविद्युत, रिमोट कंट्रोल, निऑन लाइटिंग, आधुनिक इलेक्ट्रिक मोटर आणि वायरलेस कम्युनिकेशनचा शोधकर्ता होता.

बऱ्याच गोष्टींचे शोध टेस्ला ने आकृती न काढताच लावले. तो त्याच्या मनातच शोधांचे अगदी सूक्ष्म चित्र तयार करायचा.

टेस्लाने एकटे राहण्याचे निवडले, तो एकटाच मरण पावला, परंतु त्याला कधीही एकटे वाटले नाही.

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.