Fooled By Randomness Marathi By Nassim Taleb

Fooled By Randomness Marathi मध्ये या पुस्तकाबद्दल, या लेखात माहिती देण्यात आली आहे. जीवनावर आणि शेअर मार्केटवर संधीची छुपी भूमिका. या पुस्तकाचे लेखक Nassim Nicholas Taleb आहेत.

Random = यादृच्छिक = सहजगत्या घडलेला (उददेश नसताना घडलेला)

भूतकाळातील घटना नेहमीपेक्षा कमी यादृच्छिक (Random) वाटतात (याला Hindsight Bias म्हणतात). पूर्वाग्रहांबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख वाचा.

लेखकाने हे पुस्तक त्या लोकांना डिवचण्याकरिता लिहले आहे जे स्वतःला आणि स्वतःच्या ज्ञानाच्या गुणवत्तेला खूप गंभीरपणे घेतात.

शक्यता म्हणजे कोणती गोष्ट किती वेळा घडेल फक्त हे जाणून घेणे नाही तर आपल्या ज्ञानाच्या सीमा जाणून घेणेही आहे.

तयार असणाऱ्या व्यक्तीला संधी मदत करते.

मोठ्या यशासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे – आणि अपयशासाठीही.

खूप मोठ्या संख्येत जर गुंतवणूकदार असतील तर नक्कीच त्यांच्यापैकी एक नशिबाने यशस्वी झाला असेल.

पत्रकारितेचा व्यवसाय हा निव्वळ करमणुकीचा व्यवसाय असतो, सत्याचा शोध घेणे नाही, विशेषतः रेडिओ आणि टेलिव्हिजन.

उधारीच्या ज्ञानापासून सावध रहा.

सक्षमपेक्षा भाग्यवान असणे अधिक श्रेयस्कर आहे.

आपले विश्वास हे अंधश्रद्धेने बनलेले आहेत.

आदिमानवाने नाक खाजवले आणि पाऊस झाला. त्याला वाटले आपल्या नाक खाजवण्याने पाऊस झाला. तसेच आजच्या माणसाला वाटते, रिझर्व्ह बँकेने कमी केलेल्या दरामुळे आर्थिक भरभराटी आली. किंवा त्याला वाटते की नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीमुळे कंपनी यशस्वी झाली.

पुस्तकालये अशा पुस्तकांनी भरलेली आहेत, जिथे यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशाचे विशिष्ट स्पष्टीकरण देतात. मला तर वाटते ते फक्त योग्य वेळी योग्य जागी उपस्थित होते. आपण तर शाईच्या ठिपक्यात ही आकृती शोधतो.

आपले मन संभाव्यता हाताळण्यासाठी सुसज्ज नाही; ही कमतरता तज्ञांनाही, आणि कधीकधी फक्त तज्ञांनाच मारते.

लेखक विरुद्ध समाज

समाज जे शब्द वापरतो त्या शब्दांना लेखक वेगळ्या शब्दाने ओळखतो.

समाज – लेखक

कौशल्य – नशीब

ज्ञान – विश्वास

भविष्यवाणी – अंदाज

कुशल गुंतवणूकदार – नशीबवान मूर्ख

बाजारातील कामगिरी – Survivorship bias

आपण सर्वांमध्ये अशा त्रुटी आहेत ज्या सुधारण्या पलीकडे आहेत. आदर्श मानवी समाज निर्माण करणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे.

लेखकाला सरलीकरण धोकादायक वाटते.

Skewness समस्या

एखादी गोष्ट किती वेळा यशस्वी होते, याचे काही महत्त्व नाही जर होणारे नुकसान तुम्ही सहन करू शकत नसाल तर.

तुम्ही एवढे श्रीमंत आहात मग तुम्ही हुशार का नाही ?

Nero Tulip हा एका यशस्वी ट्रेडरची जीवनशैली पाहून आकर्षित झाला.

पुढे निरो स्वतः ट्रेडर झाला. तो करोडो रुपयांचे ट्रेड डोळ्यांची पाती लवायच्या आत करायचा, पण हॉटेल मध्ये मेनू निवडताना मन बदलत राहायचा.

ट्रेडर बनण्याआधी निरोचे शिक्षण तत्वज्ञानात झाले होते. पण म्हणतात ना “तत्त्वज्ञान माणसाला अन्न देऊ शकत नाही.” पण या कारणाने निरोने तत्वज्ञान सोडले नव्हते. निरोने तत्वज्ञान सोडले कारण तत्वज्ञान माणसाची करमणूक करू शकत नाही.

निरो म्हणायचा : “मला लहान नुकसान सहन करायला आवडते. “मला फक्त माझे विजेते मोठे पाहिजेत.”

निरो त्याच्या संशयखोर वृत्तीमुळे इतर ट्रेडर एवढा श्रीमंत बनू शकला नाही.

भाग्यवान मूर्खांना थोडाही संशय येत नाही की ते भाग्यवान मूर्ख आहेत, कारण ते मूर्ख असतात.

“एखाद्या माणसाला तो स्पार्टाचा आहे का असे कधीही विचारू नका: जर तो असता तर त्याने तुम्हाला ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आधीच कळविली असती.” त्याचप्रमाणे, ट्रेडर ला फायदा होतोय का विचारू नका; तुम्ही त्याच्या हावभाव आणि चालण्यामधून हे सहजपणे ओळखू शकता.

तुमचा दंतवैद्य श्रीमंत आहे, खूप श्रीमंत.

एखादा रॉकस्टार तुमच्या दंतवैद्यापेक्षा श्रीमंत असेल. पण रॉकस्टार बनण्याचा किती लोक प्रयत्न करतात आणि किती यशस्वी होतात याचे प्रमाण पहा.

निर्णयाची गुणवत्ता ही पूर्णपणे निकालावर अवलंबून नसते.

Randomness यादृच्छिकपणामुळे आपण कसे वेडे बनतो हे या पुस्तकात सांगितले आहे. याबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक खाली दिलेल्या लिंक वरून विकत घ्या.

Fooled By Randomness Marathi

फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. वरील लिंक वरून पुस्तक विकत घ्या.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

1 thought on “Fooled By Randomness Marathi By Nassim Taleb”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.